April 29, 2015

आसू...

April 27, 2015

वेध...

वेध...

April 22, 2015

संधी...
संधी सुविचार‬

April 21, 2015

तुला विसरणारा मी नाही ...

लग्न ...

April 17, 2015

तू क्षितिजा सारखा...
जवळ यायला लागलंकी लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की....
आशेने पाहतोस .
~चंद्रशेखर गोखले

April 14, 2015

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील, 
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...
- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 वी जयंती निम्मित विनम्र अभिवादन !

इंटरकास्ट लग्न...

April 13, 2015


April 10, 2015

घर

घर हे दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवल
तर दुसऱ्याने आवरायचं
-चंद्रशेखर गोखले

तु विचारलेस काल मला
अजून ओळखतेस माझ्या आवाजाला
तुच सांग आपल्या ह्रदयाचे ठोके
विसरतात का कधी स्वतःला ...

April 8, 2015


आठवणी ...

April 6, 2015

पहिले प्रेम...

April 1, 2015

तू दिलेल्या दुः खाने
मला बरेचं काही शिकवले
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले…

मागू नकोस

मागू नकोस रे तू
आपण जगलेले ते बेभान क्षण
जरा कुरवाळू दे ना मला
ती विलक्षण आठवण

धुंद पावसातली ती
ओली गच्च संध्याकाळ
एकाच छत्रीतून केलेली
ती नशीली वाटचाल

त्या मुसळधार पावसाच्या
बेफाम सरी
अन तुझ्या सहवासाची
ती गोड शिरशिरी

सारं कसं भारलेलं
मंत्रमुग्ध झालेलं
मौनानंच जणू
सारं काही बोललेलं

माझ्या मनात कायमचा
साठवू दे रे तुला
दृष्टीआड होण्या आधी
सारं पुन्हा जगू दे रे मला

-जयश्री अंबासकर

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

-विशाल...ग़ारवा


;;