October 26, 2016
*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*
0 comments Posted by Piyush Tayade at Wednesday, October 26, 2016*दिवाळीत अंगाला उटणे लावण्याची पद्धत*
__________________________
दिवाळीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटणे अंगाला लावण्याची पद्धत कशी असावी, याचे विश्लेषण येथे देत आहोत. उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे. प्रत्येक ठिकाणी दिलेली उटणे लावण्याची पद्धत त्या त्या पोकळीत असणार्यात्रासदायक वायूंच्या गतीला अनुसरून दिली आहे.
. *स्वतःला उटणे लावणे*
*१. कपाळ : कपाळावर लावतांना मधल्या तीन बोटांचा उपयोग करून स्वतः लावतांना डावीकडून उजवीकडे या पद्धतीने लावावे.
*२. कपाळाच्या दोन्ही टोकांना बाजूला भुवईजवळ : येथे लावतांना ते बोटांच्या अग्रभागांनी डावीकडून उजवीकडे (खालून वरच्या दिशेने), तसेच उजवीकडून डावीकडे (वरून खालच्या दिशेने) चोळून लावावे.
*३. डोळ्यांच्या पापण्या : यांवर लावतांना नाकाकडून कानाकडे हात फिरवावा.
*४. नाक :याला लावतांना उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंनी खालच्या दिशेने उतरत यावे अन् खाली आल्यावर उटण्याचा वास घ्यावा. उटण्याच्या वासातून प्रक्षेपित होणारा तेजाशी संबंधित गंध फुफ्फुसांतील वायूकोषात गेल्याने तेथील काळे आवरण नष्ट होण्यास साहाय्य होते.
*५. मुखाचा वरचा भाग : या भागातून, म्हणजेच नाकाच्या खालून मधली तीन बोटे ठेवून आरंभ करून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मुखाभोवती गोल, म्हणजेच हनुवटीच्या खड्ड्यातून वर स्वतःच्या डावीकडे जाऊन मुखाभोवतीचा गोल पूर्ण करावा.
*६. गालांच्या पोकळी : गालाच्या मध्यभागातून आरंभ करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे बोटांची अग्रे गोल गोल फिरवून लावावे.
*७. कानाची पाळी : ही तर्जनी आणि अंगठा यांमध्ये धरून तिथल्या तिथे हलवून उटणे लावावे.
*८. दोन्ही कान : दोन्ही कान हातांनी पकडून कानाच्या मागच्या बाजूला फक्त अंगठा ठेवून खालून वरच्या दिशेने फिरवावा.
*९. मान : मानेच्या मागून मध्यातून दोन्ही हातांची बोटे पुढे विशुद्ध चक्राकडे आणणे
*१०. छाती आणि पोट यांचा मध्यभाग : उजव्या हाताच्या तळव्याने छातीच्या मध्यरेषेवर वरून खालच्या दिशेने नाभीकडे हात फिरवत आणणे.
*११. काखेपासून कमरेपर्यंत : काखेपासून पितृतीर्थासारखा हात, म्हणजेच अंगठा एका बाजूला अन् चार बोटे दुसर्याम बाजूला ठेवून अंगाच्या दोन्ही बाजूच्या रेषेवरून वरून खाली या पद्धतीने फिरवावेत.
*१२. पाय आणि हात : हाताची बोटे फिरवत पायांवर आणि हातांवर वरून खालच्या दिशेने उटणे लावावे.
*१३. पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषा :पावलाच्या आणि पायाच्या जोडरेषेवर अंगठा अन् तर्जनी यांनी विळखा घालून तो भाग कड्यासारखा घासावा.
*१४. डोक्याच्या मध्यभागी* : डोक्याच्या मध्यभागी तेल लावून ते हाताने घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवावे.
*दुसर्या व्यक्तीला उटणे लावणे*
*१. पाठ : दुसर्या व्यक्तीच्या पाठीला उटणे लावतांना पाठीच्या मणक्याच्या रेषेशी दोन्ही हातांच्या बोटांची अग्रे येतील अशा पद्धतीने वरून खालच्या दिशेने दोन्ही हात एकाच वेळी फिरवावेत.
*२. कंबर : दुसर्या व्यक्तीला लावतांना कमरेच्या आडव्या रेषेवर पाठीकडून तिच्या डाव्या बाजूकडून उजवीकडे येऊन परत उजवीकडून डावीकडे जावे. असे परत परत लावावे.
〰〰〰〰🌞〰〰〰〰
संकलन - श्रीधर कुलकर्णी
*ज्ञानामृत मंच*
Labels: Diwali
Labels: Diwali, Vasu Baras
Labels: Diwali
*दिवाळीचा फराळ*
दिवाळीच्या फराळाची दिवाळीत भरली सभा
लाडू आपला शिष्टासारखा मधोमध उभा.
चकली, करंजी , शेव सगळ्या बायका होत्या तोऱ्यात
लाडू, चिवडा, चिरोटा, अनरसा या पुरुषांना अपुरी पडली परात.
क्वचितच हजेरी लावणारे एकटे पडले कडबोळे
पण त्याच्या सोबतीला धावून गेले शंकरपाळे.
कुरकुरीत चकली दिसत होती उठून
तिच्या अंगावरचे तीळ दाखवत होती मिरवून.
झणझणीत चिवडा नाकी-डोळी लावत होता धार
पण दाणे, खोबरं, डाळ असा त्याचा पसाराच फार.
गोरी गुलाबी करंजी झाली होती देखणी
तिला पाहताच तिची सगळे करत होते वाखाणणी.
गुबगुबीत चिरोटा मूळातच फार नाजूक
त्याच्या जवळ येताच वास येत होता साजुक.
लाडू चिवडा दोघे मित्र बसले होते लगटून
छोटासा बेदाणा लाडू ला बसला होता चिकटून.
कडबोळे आणि शेव रंगाने मस्त
पण त्यांच्यामुळे फराळ होतो लगेच फस्त,
अधिक मासाचा लाडका अनारसाही होता हजर
जरा कमी आधिक झालं की त्याला लागते नजर.
असा हा फराळ दिवाळीची वाढवतो लज्जत
पण नीट नाही जमला तर बायकांची होते फज्जत
Labels: Diwali
त्याचं माझं भांडण
हळुवार छेडणारे त्याचे हात
अन चोरुन दाद देणारे माझे नयन
त्याचं माझं भांडण
त्याने अलगद मिठीत ओढणं
अन माझा सोडवण्याचा लटका प्रयत्न
त्याचं माझं भांडण
त्याने हळुच खोडीन पदर ओढणं
अन माझं नाटकी मागं वळणं
त्याचं माझं भांडण
त्यान हळुच कुशीत शिरणं
माझं डोक्याभोवती हात फिरवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं घट्ट वेलीसारखं बिलगणं
अन मी पापण्या झुकवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं प्रेमान रागवणं
माझं त्यावर गाल फुगवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं कान पकडुन साॅरी म्हणनं
अन माझं लाजून पाणीपाणी होणं
त्याचं माझं भांडण
एकमेकांच्या मिठीत विरघळणं
श्वासातश्वास घालुन एकमेकांसाठीच जगणं
त्याचं माझं भांडण,.........
- - अपर्णा पाटील
हळुवार छेडणारे त्याचे हात
अन चोरुन दाद देणारे माझे नयन
त्याचं माझं भांडण
त्याने अलगद मिठीत ओढणं
अन माझा सोडवण्याचा लटका प्रयत्न
त्याचं माझं भांडण
त्याने हळुच खोडीन पदर ओढणं
अन माझं नाटकी मागं वळणं
त्याचं माझं भांडण
त्यान हळुच कुशीत शिरणं
माझं डोक्याभोवती हात फिरवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं घट्ट वेलीसारखं बिलगणं
अन मी पापण्या झुकवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं प्रेमान रागवणं
माझं त्यावर गाल फुगवणं
त्याचं माझं भांडण
त्यानं कान पकडुन साॅरी म्हणनं
अन माझं लाजून पाणीपाणी होणं
त्याचं माझं भांडण
एकमेकांच्या मिठीत विरघळणं
श्वासातश्वास घालुन एकमेकांसाठीच जगणं
त्याचं माझं भांडण,.........
- - अपर्णा पाटील
Labels: Kshan Premache, Marathi Prem Kavita
"माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी". - पु. ल. देशपांडे
.
.
"कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही.
लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. "शी ! कसले हो हे भडक रंग !" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा !
समोरची बाई म्हणत असते,
"कसला हा भरजरी पोत !"
हा शांत.
गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.
समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ, "अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.
सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,
"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"
एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.
आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात, "नारायण, इचलकरंजी लेमन घे"
खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.
--------- पु. ल. देशपांड
Labels: Pu. La. Deshpande
June 30, 2016
मुसळधार कोसळणारा पाऊस
सोबत दर्द रफीजींच्या आवाजातला
आणि कमी आहे फक्त तुझी
रिमझिम बरसणाऱ्या निवांत धारा
खमंग भजी चहा बशीतला
आणि कमी आहे फक्त तुझी
कडाडणाऱ्या विजा सोसाट्याचा वारा
समोर तरळणारा प्रसंग आठवणीतला
आणि कमी आहे फक्त तुझी
छतावरून गळणारे टप टप थेंब
ओघळणारा कण कण माझ्या डोळ्यातला
आणि कमी आहे फक्त तुझी
प्रज्ञा रायकर जोशी
Labels: Aathavan, Pahila Paus, Paus, Pavsala
;;
Subscribe to:
Posts (Atom)