September 23, 2015
तूच माझ्या कुटुंबाची ‘डायरेक्टर’!तूच माझ्या कुटुंबाची ‘डायरेक्टर’!
Posted by Piyush Tayade at Wednesday, September 23, 2015तूच माझ्या कुटुंबाची ‘डायरेक्टर’!तूच माझ्या कुटुंबाची ‘डायरेक्टर’!
फोटो शेअर करा
avinash.mahajan@timesgroup.com
नागपूर : घराचा गाडा हाकण्यासाठी मला असलेली तुझी साथ...मी वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचावे...माझे आरोग्य चांगले राहावे...माझ्या आवडी निवडी जपण्यापासून ते माझ्या जेवणातील योग्य 'मेन्यू' ची काळजी तू घेतेस. खऱ्या अर्थाने तूच माझ्या आयुष्याची 'डायरेक्टर' आहेस, अशी कृतज्ञता तुम्ही तुमच्या पत्नीजवळ अलीकडे व्यक्त केली नसेल तर आज ती व्यक्त करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण आज आहे...वाइफ अॅप्रीसिएशन डे !
सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस जगभरात साजरा होतो. 'मदर डे'ला आई म्हणून तिचे कौतुक होत असेल, मॅरेज अॅनिव्हर्सरिलाही तुम्ही प्रेमाचे दोन शब्द बोलतच असाल पण खास पत्नी म्हणून घराचे घरपण सांभाळल्याबद्दल तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. शेजारून आलेली भाजी कितीही 'टेस्टी' वाटत असली तरी आज घरच्या भाजीचीच स्तुती करा. वास्तवात केवळ पत्नीच नाही तर आई, मैत्रीण, प्रेयसी, अशा किती तरी वेगवेगळ्या भूमिका तेवढ्याच जबाबदारीने पार पाडणाऱ्या आपल्या सहचारिणीशी दोन गोड शब्द बोला. भावना शेअर करा... आर्थिक तंगीच्या दिवसातील तिच्या मॅनेजमेन्टचे, कोणत्याही तासांचे बंधन न पाळता रात्रंदिवस केवळ कुटुंबासाठी अविरत राबणाऱ्या पत्नीचे थोडे तरी कौतुक करा... बघा वर्षभर तरी तुम्हाला आनंदाच्या अनेक रिटर्न गिफ्ट मिळाल्यावाचून राहणार नाहीत.
आनंद बहार...
पत्नी, सहचारिणी, अर्धांगिणी असे कितीही आवडीची बिरूदे लावा... लाडाच्या नावानेही हाका माराच पण तिच्यासाठी एक फूल, तिला आवडणारे चॉकलेट, एखादा बुके, साडी आणखी काहीही जे तुम्ही तिला देऊ इच्छित असाल ते गिफ्ट द्या ! राहिले गिफ्ट केवळ माझ्या यशाची 'गाथा' ही तुझ्याविना अपूर्ण आहे,एवढेच म्हणा.. बघा घरातील आनंद द्विगुणीत होईल !
Labels: Marathi Lekh, Nate
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment