August 20, 2013

' तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना'
असं एक खास नातं म्हणजे बहिण-भावाचं नातं.
या नात्यात खोड्या असतात, रुसवे फुगवे
असतात, तर कधी हाणामारीपर्यंत मजल
गेली असते. पण ही झाली नाण्याची एक बाजू
दुसरीकडे आई-बाबा रागावल्यानंतर
आपल्या जवळचं वाटणारं, आपल्याला समजून
घेणारं, जनरेशन गॅपमध्ये आपल्या पाठीशी ठाम
उभं राहणारं नातं असतं तेही बहिण भावाचं.
सुखदु:खाच्या प्रसंगात सगळ्यात जवळचं नातं
म्हणजे बहिण भावाचं. अशा निखळ
आणि नि:स्वार्थ प्रेमाची,
संबंधाची परंपरा कायम जपणारा कौटुंबिक सण
म्हणजे 'रक्षाबंधन'.
लहानपणापासून असणा-या या सणाचा उत्साह
कितीही मोठे झालो तरी कायम असतो. पण
अनेकदा भाऊ-बहिण कामाच्या तणावात
आणि धकाधकीच्या जीवनात
रक्षाबंधनाची सुटी काढून एकमेकांकडे पोहचू
शकत नाही. किंवा काही जण एकमेकांपासून खूप
लांब राहातात. पण
आपल्याला आजच्या दिवशी एकमेकांची आठवण
विशेष करून येत असते. त्यांच्याशी खूप बोलावं,
आपलं मनं मोकळं करावं असं ही वाटत असतं.
अशा आपल्या भावा-बहिणींना
आपल्या शुभेच्छा आणि मनोगत
प्रतिक्रिया स्वरुपात इतर
वाचकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला खूप आनंद
होईल.
आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या 'गोडगोड'
शुभेच्छा!


0 comments:

Post a Comment